Home यवतमाळ गांजा तस्करांना बेड्या, पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

गांजा तस्करांना बेड्या, पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

135
पांढरकवडा प्रति:-विरेंद्र चव्हाण
पांढरकवडा:- दि.२७ फेब्रुवारी २०२६ पोलीसांनी एनएच-४४ महामार्गालगत सुरू असलेल्या गांजा विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करत २ किलो १२० ग्रॅम गांजा व इतर मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे.
दि. २७/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम पिपरी रोड येथील संदीप उर्फ बापू नामदेव गंधेवार (वय ३३) हा आपल्या शेताजवळ पांढऱ्या रंगाच्या मोपेडमधून ग्राहकांना प्लास्टिक पुड्यांमध्ये गांजा विक्री करीत आहे.या माहितीच्या आधारे मा. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक परवानगी घेऊन सापळा रचण्यात आला.
कारवाईत तीन आरोपी ताब्यात
पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढील आरोपी मिळून आले –संदीप उर्फ बापू नामदेव गंधेवार (वय ३३, रा. वार्ड क्र. ०१, पिपरी रोड, ता. केळापूर, जि. यवतमाळ)आर्यन सतीश मुन (वय २१, रा. महात्मा ज्योतीबा फुले वार्ड, पांढरकवडा)
सुजल अनिल कावडे (वय २१, रा. राममंदिर वार्ड, पांढरकवडा)त्यांच्या अंगझडती व वाहनाच्या डिक्कीतून ६८ लहान पारदर्शक प्लास्टिक पुड्यांमध्ये ३६९ ग्रॅम गांजा (फुले, पाने, बिया सहित) जप्त करण्यात आला. प्रत्येक पुडी किंमत १५० रुपये प्रमाणे एकूण किंमत १०,२०० रुपये होती.या प्रकरणी पो.स्टे. पांढरकवडा येथे विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वणी येथून मुख्य पुरवठादार अटक
मुख्य आरोपीच्या कबुलीजबाबावरून वणी येथील निखील हेमंत घोडंगी (वय ३०, रा. चिखलगाव, वणी) याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी १ किलो ७५१ ग्रॅम गांजा (किंमत ३५,०२० रुपये) जप्त करण्यात आला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.एकूण १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त सदर कारवाईत आरोपींकडून एकूण –
२ किलो १२० ग्रॅम गांजा (किंमत ४७,२२० रुपये)
चार मोबाईल फोन (किंमत ४०,००० रुपये)
दोन मोटरसायकली (किंमत ७५,००० रुपये)
असा एकूण १,६०,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई मा. कुमार चिंता,मा.अशोक थोरात व मा.रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार एल.डी.तावरे यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप नरसाळे पोउनि नितीन सुशीर,पोउनि स्वप्निल कावरे, जमादार प्रमोद जुनूनकर, विलास जाधव, गजानन पत्रे, सुनील राठोड, सचिन काकडे, संदीप मडावी, मीनाक्षी गीते, राजू मुत्यालवार, यांनी पार पडली असून पुढील तपास सपोनि रमाकांत खंदारे करीत आहेत