Home यवतमाळ कळंब तालुक्यातील दोनोडा येथे थरार : कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या

कळंब तालुक्यातील दोनोडा येथे थरार : कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या

639
बाप लेकाने पाडला एकाचा मुडदा
कळंब तालुका प्रतिनिधी:-विरेंद्र चव्हाण
कळंब :-पुर्ववैमनस्यातून शेजारीच राहणाऱ्या एका युवकाचा अंगात सैतान संचारलेल्या बाप-लेकांनी कुन्हाडीने घाव घालीत हत्या केली. ही हत्येची रक्तरंजीत घटना दोनोडा गावात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजताच्या दरम्या घडली. मृताचे नाव दत्ता केशव चौधरी (वय ३३) असे आहे. आशीष मारोती करलुके (वय ३३) व त्याचे वडील मारोती करलुके (वय ५५, रा. दोनोडा) असे आरोपी बापलेकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये आरोपी व मृतक यांच्यात भांडण झाले होते. त्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता व न्यायालयात खटला सुरू होता. ही जुनी केस सध्या न्यायालयाच्या बोर्डावर आली होती. बापलेक हे मृतकावर केसमधे सेटलमेंट करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते. आरोपीआशिष पोलिस भरतीची तयारी करत असल्याने नोकरीत अडचण येऊ नये म्हणून ते सेटलमेंट करण्यासाठी धमक्या देत होते. मात्र मृतकाने तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक व खटके उडत होते अशातच मंगळवारी ळवारी (ता. २४) सकाळी सुमारे ९.१५ वाजताचे दरम्यान गावातच आरोपींनी धारदार कुन्हाडीने सपासप वार करून त्यांची हत्या केली.
चौकट==
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सहहप्रकरणी मृतकाचे वडील केशव चौधरी वय 55 वर्ष यांनी कळबपोलिसात फिर्याद दिली असून कळब पोलिसांनी स्पॉट पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात ठेवला असून आरोपी वडील मारुती करलूके यांना ताब्यात घेतले असून आरोपी मुलगा आशिष मारुती करलुके वय 33 वर्ष हा घटनास्थळावर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे मानवी राग व सूड भावना किती भयानक परिणाम करू शकतात हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे
*पसार आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल* –
राजेश राठोड ठाणेदार कळंब