Home यवतमाळ वणी पोलीस स्टेशनलगत चाय कँटीन’- वसुलीचा अड्डा की प्रशासनाची मूकसंमती?

वणी पोलीस स्टेशनलगत चाय कँटीन’- वसुलीचा अड्डा की प्रशासनाची मूकसंमती?

500
पोलीस स्टेशनच्या भिंतीला चिटकून सुरू असलेली चाय कँटीन; हप्ता वसुलीपासून गोपनीय माहिती लीक होण्यापर्यंत गंभीर आरोप
वणी | प्रतिनिधी
वणी पोलीस स्टेशनजवळील चाय कँटीन सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. ही कँटीन केवळ चहा विक्रीपुरती मर्यादित नसून, येथे हप्ता वसुली जमा होत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही चाय कँटीन अतिक्रमणाच्या जागेवर उभारण्यात आली असून थेट पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून आहे. त्यामुळे पोलिसांची गोपनीय माहिती बाहेर जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
आत्याचारग्रस्त फिर्यादी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. त्यांची ओळख व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवणे आवश्यक असताना, ती माहिती बाहेर जात असल्याचे आरोप होत आहेत — ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सदर चाय कँटीन पंचायत समितीच्या जागेवर बेकायदेशीरपणे सुरू आहे. तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
❗ नागरिकांचे थेट सवाल —
पोलीस स्टेशनला लागून कँटीन कशी काय सुरू?
अतिक्रमण असूनही प्रशासन गप्प का?
हप्ता वसुलीच्या चर्चांकडे दुर्लक्ष का?
फिर्यादींची गोपनीयता धोक्यात कोण टाकत आहे?
शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तात्काळ ही चाय कँटीन हटवावी अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
🔴 आता तरी प्रशासन जागं होणार का?
की वणीमध्ये कायद्यापेक्षा ‘चाय कँटीन संस्कृती’च मोठी ठरणार?