
मखमलाबाद कला वाणिज्य महाविद्यालयात राम खुर्दळ यांचे व्याख्यान..

नाशिक – इंटरनेट ऑनलाईन पद्धत्तीने आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात वाढले आहेंत, मात्र हे आर्थिक व्यवहार, खर्च करताना मात्र आपला पिन किंवा पासवर्ड हा खाजगी ठेवा,व तो महिना दोन महिन्यातून बदला तरच आपली आर्थिक फसवणूक टाळता येईल,जर अश्या फसवणुकीचे बळी आपण ठरलो तर १९३० या हेल्पलाईनला तातडीने तक्रार करा. सध्या आपले खाजगी अकाउंट अकाउंट हॅक करून वैयक्तिक माहिती चोरण्याचे प्रकार वाढले आहेंत तसेच बनावट अकाउंट करून, बक्षीसाचे अमिष दाखवून,आपल्याला बाईंकेतून बोलतो असे सांगून ओटीपी मागून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे सध्या वाढले आहेंत, यातून सुटका करायची तर आपला, ई मेल, आपले सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड दोन महिन्यातून बदलत राहा ,व कुठल्याही चुकीच्या व्यक्तीकडूक येणारे फोन टाळा,असे आवाहन सोमवारी दि ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मखमलाबाद कला, वाणिज्य महाविद्यालयातझालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेत प्रथम सत्रात व्याख्याते तथा जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांनी “वाढते सायबर गुन्हे व त्यावर उपाय”या
विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्रा ज्ञानेश्वर भगुरे होते,यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मखमलाबाद महाविद्यालयात युवक,युवती उन्नतीकरण अंतर्गत “वाढते सायबर गुन्हे व ते रोखण्यास उपाय” विषयावर कार्यशाळेचे पाहिले पुष्प व्याख्याते राम खुर्दळ यांनी गुंफले,
कार्यशाळेचा प्रारंभ विद्येची देवता सरस्वती पूजन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाले.प्रारंभी कार्यशाळेची फीत कापून राम खुर्दळ यांनी औपचारिक उदघाटन केले.
त्यानंतर वाढती सायबर गुन्हेगारी व त्या रोखण्यासाठी उपाय विषयावर बोलतांना ऑनलाईन चॅटिंग, सोशल मीडियाद्वारे मोठ्या पगाराची नोकरीं,बक्षीस याचे अमिश दाखवणे,प्रसंगी मानसिक शोषण व आर्थिक फसवणूक हे प्रकार खूप वाढलेत,यात सर्वाधिक फसवणुकीचे प्रकार विध्यार्थी, व जेष्ठ नागरिक, शेतकरी व महिलांना सायबर गुन्हेगारीने फसवण्याचे प्रकार वाढलेत,दमदाटी केली जाते,गुन्हे झाल्याचे हॅकर्स फोन करतात,चीन पाक तसेच देशांतर्गत दिल्ली,झारखंड येथील काही भागातून अस्या फसवणुकीच्या अधिक घटना घडवल्या जातं आहेंत, त्यासाठी आपण दक्ष राहने हा उपाय आहे, तातडीने तक्रार करणे, आवश्य आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने बैंकेस कळवून आपले अकाउंट ब्लॉक करण्यास सांगा असे पर्याय करा,फसवणूक वाढतेय मात्र न्याय मिळणे फार क्वचितच त्यासाठी स्वतःला मर्यादा आखून घ्या.असे राम खुर्दळ यांनी सांगितले,अध्यक्षीय मनोगतात प्रा ज्ञानेश्वर भगुरे यांनी ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडलेल्या घटना सांगून सर्वांनी सजग राहा असे आवाहन केले, प्रस्तावना प्राचार्य डॉ मनीषा आहेर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा अमोल ठाकरे यांनी तर आभार भाग्यश्री कोरडे यांनी मांडले. यावेळी डॉ आर डी खुर्चे, प्रा भगवान शिंदे, ए एस धार राव, के एल शिंदे,प्रा गोळे,विद्यार्थी प्रतिनिधी कु जगदीश भोये यासह विध्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी:
मविप्रच्या मखमलाबाद येथील कला वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेत ” वाढते सायबर गुन्हे, ते रोखण्यास पर्याय” विषयावर मार्गदर्शन करताना व्याख्याते राम खुर्दळ,सोबत व्यासपीठावर प्राचार्य डॉ मनीषा आहेर, प्रा ज्ञानेश्वर भगुरे, प्रा अमोल ठाकरे ई..














































