Home यवतमाळ स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन…

स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन…

140

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – लेट ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल पारवा येथे दिनांक ७ फेब्रुवारी शनिवारला विध्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन पार पडले.
. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास देशमुख पारवेकर तर उदघाटक म्हणून ठाणेदार हेमंत चौधरी हे होते. याक्षणी भेदूरकर, वाघूलकर,उपसरपंच संजय आरेवार,ग्रा.पं.सदस्य बालाजी पोटपिल्लेवार, राजू दवणे, सुरेश मेश्राम, तसेच भास्कर इंगोले, प्रमोद कांबळे, ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष संदीप जैस्वाल उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शिक्षणाचे महत्व व उत्तम अध्ययन व अध्यापन कार्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले याचसोबत शाळेचे अध्यक्ष जयस्वाल यांनी शाळेत राबविलेले क्रीडा स्पर्धा, अध्यापन कार्य याविषयी माहिती देवून शाळेमार्फत विध्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेने विध्यार्जन करण्यासाठी प्रोत्साहित केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. गीता तुमराम, शिक्षक अर्चना मानेकर, कांचन नांदेकर, शैलजा पांढरकर, रुबीना खान, कु. वैष्णवी पोलावार, कु. रविना प्रधान, कु. नुरी शेख, कु. सानिया खान, कु. धनश्री जाजमोगवार, कु. गायत्री जाजमोगवार व जोशना वासनिक यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन प्रमोद कांबळे यांनी केले.