Home यवतमाळ पारवा जि. प. कन्या शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न….

पारवा जि. प. कन्या शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न….

451

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पारवा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेत दिनांक २ फेब्रुवारी सोमवारला स्नेहसंमेलन आयोजन करून यात विविध सांस्कृतिक कलाविष्काराने मोठ्या उत्साहात विध्यार्थिनींनी साजरा केला.

दैनंदिन अभ्यासाबरोबरच विध्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी शाळेत स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या संमेलनात प्रमुख पाहुण्यांना शाळेच्या मुख्यद्वारा पासून विध्यार्थिनींनी स्वागत करीत मंचकावर आणले. उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी महिला मेळाव्यातील उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिलांना व बाल आनंद मेळाव्यात कमी गुंतवणिकीत जास्त खरी कमाई करणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विध्यार्थिनींना प्रोत्साहनपर अनुनाक्रमे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकरे हे होते तर उदघाटक म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी हे लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बालाजी पोटपिल्लेवार, राजू दवणे, शा. व्य. समितीच्या उपाध्यक्ष उषाताई चौधरी, पारवा केंद्राच्या केंद्रप्रमुख मिनाताई धोटे, प्रमोद दोडावार,सेवानिवृत्त शिक्षक अशोक जिल्डवार घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहु. संस्थेचे उपाध्यक्ष तथा लोकमत प्रतिनिधी दिनेश गाऊत्रे, संदीप जयस्वाल,अमोल उदार,लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका अर्चना आरेवार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंचकावर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विध्यार्थिनींनी विविध मराठी व हिंदी गाण्यावर आधारित नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांची मने जिंकली. चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये खाऊसाठी बक्षीस दिले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत भेदूरकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीष सुकंडवार व मातापालकांचे विशेष सहकार्य लाभले.