Home यवतमाळ पारवा लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात.

पारवा लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात.

114

चिमुकल्यांच्या अदाकारीने रंगले मंच

घाटंजी ( तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील पारवा येथिल लिटिल चॅम्प इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये चिमुकल्या विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार व विध्यार्थांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सदर कार्यक्रमाचे उदघाटन बा. दे. विद्यालयाचे मुख्याध्यापक चौलमवार यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव रुपेश आरेवार व मुख्याध्यापिका अर्चना आरेवार हे मंचकावर उपस्थित होते.सोबतच ठकसेन लोखंडे, अमोल शेंडे, सरफरोद्दीन काजी,अनु येनरवार, जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर याची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी विविध हिंदी,मराठी गाण्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थित्यांची मने जिंकली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका स्वाती आरेवार,सविता कामटकर,शिवानी बोईनवार,आणि गिरीश सुकंडवार यांनी अथक परिश्रम घेतले.