Home यवतमाळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू” एक तरुणी गंभीर

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू” एक तरुणी गंभीर

1014

पांढराकवडा ता. प्रति:-विरेंद्र चव्हाण

पांढरकवडा – तालुक्यातील वणी यवतमाळ रोडवर उमरी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रक क्र. एम एच ३४ बी झेड २९३२
ने होंडा शाईन गाडी क्र.एम एच २९ सी एफ ०७७३ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला
या अपघातात विकास ज्ञानेश्वर सलाम (वय २६, रा. लिंगटी ) व पायल रोशन कुंभारे (वय २४, रा. लिंगटी ) यांचा जागीच मृत्यू झाला तर तनुजा राजू वाघाडे (वय १९, रा. सुना) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पेंढारकर करीत आहे.