Home बुलडाणा शिक्षकाचा अल्पवयिन विद्यार्थिनी वर अत्याचार ,

शिक्षकाचा अल्पवयिन विद्यार्थिनी वर अत्याचार ,

378

 

गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ,

अमिन शाह

मलकापूर जी , बुलडाणा

पवित्र अशा गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मलकापूर शहरातील एका शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून विद्यार्थिनीवर अत्याचार करून नंतर स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या शिक्षकासह एका अल्पवीन विद्यार्थिनीवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील एक विद्यार्थीनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षक मुकेश परमशिंग रबडे (वय ४० वर्ष, रा. तरोडा, ता. मोताळा) याने पीडित विद्यार्थिनीला तहसील चौकात बोलावले असता तो शिक्षक तिच्या ओळखीचा असल्याने ती विद्यार्थिनी गेली असता, त्या शिक्षकाने तिला पंचमुखी मंदिराजवळील
एका रूममध्ये नेल्यावर आरोपी शिक्षकाने पीडितेच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून स्क्रिन रेकॉर्डिंग कर, असे सांगुन तिच्यावर अत्याचार करून तिला धमकावून तिला दुसऱ्या दिवशी सोडताना झालेला प्रकार जर कोणाला सांगितला तर, व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी दिली.
तर पीडितेच्या मैत्रिणीने रेकॉर्डिंग व्हायरल केल्याने ते पीडितेच्या कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्या मुलीला तिच्या कुटुंबीयाने विचारले असता तिने
घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावरून पीडितेने मलकापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी या प्रकरणी कलम ६४ (२) (एफ), ६४ (२) (एम), ११५ (२), ३५१ (२), ३ (५) बिएनएस सहकलम ४,६ पोस्को ६७ माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे दाखल अधिकारी पोहेकॉ शरद मुंढे असून, तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे करीत आहेत.