
पारवा व सावरगांव केंद्रातील शिक्षकांचा समावेष..

घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील पारवा केंद्र व सावरगांव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचे शिक्षण परिषद पारवा जिल्हा परिषद कन्या शाळेत सामूहिक रित्या केंद्र प्रमुख श्रीमती मिनाताई धोटे यांच्या मार्गदर्शनात दिनांक ५ डिसेंबर शुक्रवारला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
या शिक्षण परिषदेत केंद्र प्रमुख मीनाताई धोटे यांनी दोन्ही केंद्रातील शिक्षकांना अध्यापन कार्याविषयी व शैक्षणिक बाबतीत विविध माहिती देत मार्गदर्शन केले. याशिवाय डॉ. जयंत नारळीकर गणित आणि अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत खान अकॅडमी प्लॅट फॉर्म वापराबाबत सौरभ टिकले यांनी सुलभन कार्य केले.दोन केंद्रातील शाळेच्या शिक्षकांचे एकत्र शिक्षण परिषद आयोजित असल्याने सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होते. या शिक्षण परिषदेत सुरुवातीला उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे पारवा जि.प. कन्या शाळेच्या चिमुकल्या विध्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून स्वागत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिक्षण परिषदेच्या उदघाटना प्रसंगी केंद्र प्रमुख मीनाताई धोटे, सौरभ टिकले, वाढोणा शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक वसंत मोहुर्ले प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. याक्षणी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष दिपाली कामडी यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर ला संपला असतांना सुद्धा त्यांचा विध्यार्थिनींशी नाळ जुडल्याने त्या आजही शाळेवर येत असल्याने केंद्र प्रमुख धोटे व कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक वसंत मोहुर्ले, अहिल्या मेश्राम,गीता मानकर,दिपक पाथरडकर,तुषार गुल्हाने, विवेक दावडा,भाग्यश्री नेवारे, सचिन मांडवगोडे, निता नन्नावरे, श्रीकांत बोल्लीवार, संगीता पांढरमीसे, स्वाती भोयर, संजय पोहणकर,स्वप्नील हिवरे, दिनेश सोनवणे,गणवीर,पडगीलवार यांचेसह शिक्षक वर्ग उपस्थित होते.या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन दत्ता आडे यांनी केले तर परिषदेची सांगता केंद्र प्रमुख धोटे यांनी केली.











































