Home यवतमाळ वणीच्या स्वयंघोषित एका पत्रकाराला दिला चोप, “त्या पत्रकाराचा काळा धंदा”

वणीच्या स्वयंघोषित एका पत्रकाराला दिला चोप, “त्या पत्रकाराचा काळा धंदा”

1194
वणी – दिनाक 11 नोव्हेंबर 2025 रोजी वणी पोलिस अधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या समोर भाजी मंडी परिसरात उर्दू शाळा आहे , आगामी नगर पालिका निवडणूक असल्यामुळे उर्दू शाळेची पाहणी करण्याकरिता आले असताना पोलीस अधिकाऱ्यासमोर हाफिस नावाचा व्यक्ती सोबत स्वतःला पत्रकार समजणारा त्या व्यक्तीने हुज्जत केली.
तसेच हाफिजला कानशिलात देखील वाजवली म्हणून हाफिजने त्या स्वयंघोषित पत्रकाराला झोडपले हे सर्व प्रकरण वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या प्रत्यक्ष समोर झाल्यानंतर हफिज ऊर्फ टापु याला पोलीस गाडीत बसून ठाण्यामध्ये नेण्यात आले. सदर प्रकरण पाहता ठाणेदार साहेबांनी सदर दोन्ही व्यक्ती जे वैयक्तिक एका पोलीस अधिकाऱ्यासमोर महाराण करत आहे त्यांना गाडीत बसून पोलीस स्टेशनला न्यायला पाहिजे होते. परंतु फक्त हफिज टापुला गाडित बसून नेण्यात आले, तर हाफिज टापुवर ही कारवाई व गुन्हे दाखल आहेत.
स्वयंघोषित पत्रकार यांच्यावरही विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तसेच स्वयंघोषित पत्रकार यांचे काही पूर्वी पोलीस कर्मचारी, टॉपिक पोलीस यांच्यासोबत सुद्धा वादविवाद झाले आहेत.
सदर स्वयंघोषित पत्रकार वणी शहरातील नागरिक यांना सुद्धा माहिती आहे लोकांच्या कामांमध्ये काड्या करणे, कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याची तक्रार करणे, या स्वयंघोषित पत्रकाराचा धंदा बनलेला आहे. तसेच वणी शहरातील काही पोलीस कर्मचारी याला भेटतात.
वणी येथे दिनांक 11 नोव्हेंबर 2025 ला घडलेली घटना तीही एका विशेष पोलीस अधिकाऱ्यासमोर तेही चक्क मारपीठ यावरून दिसून येते की पोलिसांची वाचक दिवसान दिवस कमी होत चाललेली आहे. या सदर गोष्टीची वणी शहरात जनसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे.