Home वाशिम ८,२४,०००/- रू किंमतीच्या बुलेटसह ०९ मोटार सायकली जप्त

८,२४,०००/- रू किंमतीच्या बुलेटसह ०९ मोटार सायकली जप्त

146

वाशिम जिल्हा व आंतरजिल्हयातील चोरी करणारी टोळी जेरबंद

रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ,

फुलचंद भगत
वाशिम:-गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हददीतून मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटना घडल्याने पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी.पथकास मार्गदर्शन करून चोरांचा शोध घेवून मोटार सायकल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून डी.बी. पथकाने तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास करून व मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक १२/१०/२०२५ रोजी संशयित इसम नामे सचिन उर्फ मिठठू अशोक मानकर, वय २८ वर्षे, रा. रामनगर, ता. रिसोड, जि. वाशिम यास ताब्यात घेवून त्यास चोरी गेलेल्या मोटार सायकलीबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने वाशिम व हिंगोली जिल्हयातून मोटार सायकली चोरी केल्याची कबूली दिली. त्यानंतर नमूद आरोपी याचेकडून पोलीस स्टेशन रिसोड व वाशिम शहर इत्यादी ठिकाणच्या एकूण ०९ मोटार सायकल किंमत ८,२४,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड,सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम नवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू, महादेव चव्हाण, आशिष पाठक, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, सुनिल तिवाले, अमोल ठाकरे, विश्वास चव्हाण तसेच सायबर सेलचे संदीप वाकूडकर यांनी केली आहे.