Home बुलडाणा बुलडाणा येथे भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकऱ्याचे टावर आंदोलन..

बुलडाणा येथे भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकऱ्याचे टावर आंदोलन..

726

 

शासन प्रशासन आणि आंदोलकांमध्ये ॲड रोठेची मध्यस्थी यशस्वी.

अखेर पाच तासानंतर शासन प्रशासनासह बुलढानेकरांनी सुटकेचा श्वास घेतला..

अमिन शाह

बुलढाणा

प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीतील मशागत थांबवली म्हणून बुलढाणा येथील बीएसएनएलच्या 300 फुट टावरवर रविवारी दुपारी बारा वाजता चढून आंदोलन करणारे येळगाव येथील शेतकरी राजू काकडे टावरवर चढल्यामुळे शासन प्रशासन खळबळून जागे झाले. दुपारी बारा वाजता बीएसएनएल टॉवरच्या सर्वोच्च शिखरावर चढून आंदोलन करणाऱ्या राजू काकडे यांचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे कोणताही संपर्क होत नव्हता. अशा परिस्थितीत चार तास उलटून गेले परंतु संपर्क होत नसल्यामुळे शासन प्रशासन हातबल झाले. कोणाला वरती चढवले तर आंदोलकांने वेगळा अर्थ काढून उडी घेतली तर वेगळेच विपरीत घडू नये.या भीतीने शासन प्रशासन सुद्धा निर्णय घेण्यास कचरत होते.
अशा परिस्थितीत ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आंदोलक आणि शासन प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आंदोलन कर्त्याशी माईक वरून संवाद साधत त्यांना अस्वस्थ केले.त्यामुळे अखेर सायंकाळी पाच वाजता पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आंदोलक खाली उतरले.

बुलढाण्यातील रविवारचा बाजार असल्यामुळे जमावाला नियंत्रणात ठेवून आंदोलन कर्ता राजू काकडे यांना खाली येईपर्यंत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अथक परिश्रम करीत चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गृह विभागाचे अधीक्षक हिवाळे, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, यांच्यासह बीएसएनएल आणि संबंधित विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ॲड.रोठेंची मध्यस्थी यशस्वी ठरली..

राजू काकडे यांची येळगाव येथील शेत जमीन शासनाने अधिग्रहित केल्यामुळे त्यांच्याकडे फक्त सद्यस्थितीत पाऊण एक्कर शेती असून सदर शेतीत सुद्धा मशागत करण्यासाठी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले. त्यामुळे जीवावर उदारहून राजू काकडे या शेतकऱ्याने टावर वर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
शासन प्रशासनाने असंख्य प्रयत्न केले.परंतु वेळेवर आझाद हिंद चे ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आंदोलक आणि प्रशासनामध्ये केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली.आंदोलकांसोबत माईक वरून संवाद साधत मोबाईल सुरू करण्याची विनंती ॲड रोठेंनी केली. त्यांच्या परिवारासोबत त्यांची चर्चा घडवून आणली. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने मी स्वतः शासन प्रशासनासोबत बोलणे केले.तुमची मागणी पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने ॲड रोठेनी दिले. त्यावर विश्वास ठेवून आंदोलक राजू काकडे यांनी मोबाईल सुरू केला. त्यावर पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासनासोबत त्यांची चर्चा घडवून आणली.ज्यामुळे पाच तासानंतर राजू काकडे बीएसएनएल टॉवर वरून खाली उतरले.

त्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे,तहसीलदार पाटील, पोलीस निरीक्षक राठोड आणि ऍड सतीशचंद्र रोठे यांनी आंदोलन राजू काकडे यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू केले. तर यापुढील सदर शेतकऱ्याची न्यायदानाची प्रक्रिया सांभाळणार असल्याचे ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.