Home विदर्भ ब्रम्हपुरीत पक्षप्रवेशानंतर पुढऱ्याकडून कार्यकर्त्यांचे अवैध लाड.

ब्रम्हपुरीत पक्षप्रवेशानंतर पुढऱ्याकडून कार्यकर्त्यांचे अवैध लाड.

718

अवैध दारू विक्रीतून रवी, नदी-चे सेटलमेंट

ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी
रुपेश देशमुख

चंद्रपूर – ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही वर्षांपासून अनेक गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अवैध धंद्यातील रवी आणी नदी- नामक मोरके एका राजकीय पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आपल्या पुढऱ्याच्या मागे पुळे शेपटी हलवत त्यांच्याच आश्रयात कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा करीत अवैध धंद्यात अग्रेसर असल्याने तालुक्यातील गलिच्छ राजकारनाच्या अशा नव्या चेहऱ्यावरून नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ब्रम्हपुरीत एका मोठ्या पक्षाच्या पुढऱ्याचा कार्यकर्ता म्हणून नव्याने रुजू झालेले ब्रम्हपुरीतील रवी आणी नदी- यांनी अवैध दारू व्यावसायात ब्रम्हपुरी (गांधीनगर, हनुमान नगर, सुंदर नगर) खेड, तोरगाव, नान्हो्री या क्षेत्रात अल्पवयीन मुलांची मोठी साखळी निर्माण करून अवैध व्यवसायाची सुरुवात केली असून “माझ्या कडुन माल घ्या अन्यथा पोलिसांकडून कारवाईला सामोरं जावं लागणार” अशी धमकी देतं सर्राईत गुन्हेगारीचा कार्य करीत असतांना कर्तव्यदक्ष “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” पोलिस विभाग सुद्धा मोठ्या पुढाऱ्याचे कार्यकर्ते म्हणून अशा अवैध व्यवसायिकावर कारवाई करण्यात मोठा हलगर्जीपणा करीत असल्याने पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा तालुक्यात मोठा प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमाक्का यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी संपूर्ण जिल्हयात अवैध धंद्यांच्या विरोधात सातत्याने नाकाबंदी व छापे टाकत असतात, तर सर्व पोलीस ठाण्यांतील प्रभारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडक बंदोबस्तामुळे जिल्हाभरात रेती तस्करी, कमिशन खोरी,जुगार, सट्टेबाजी व अवैध दारूचे अड्डे चालवणारे माफिया आणि घातक बंदी असलेला गुटखा, खर्रा, सुगंधित तंबाखू, बनावट मिठाईचे रॅकेट चालवणारे सराईत लोक सतर्क दिसून येतात मात्र याचं व्यवसायाला ब्रम्हपुरी तालुक्यात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंदाचे दिवस आले आहेत त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच अंधारात अवैध धंदे व प्रकाशात “व्हाईट कॉलर” मध्ये तालुक्याच्या राजकारणात आढळून येत आहेत.ऐयाशी व आरामदायी जीवन व्यथित करण्याकरिता अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी घेतं अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईला ब्रम्हपुरी तालुक्यात लोटत आहेत त्यामुळे अवैध धंद्यात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांईचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून पुढऱ्यांच्या प्रभावाने करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पुढारी व पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. 

आपल्या पक्षातील प्रसिद्धी मित्र मंडळी कडून अवैध धंद्यातील रवी आणी नदी- आम्ही जनसेवक लोकं हिताचे कार्यकर्ते म्हणून जनसामान्य लोकांत पैस्याच्या बळावर लोकांत बातम्या पेरण्यात वस्ताद आहेत मात्र राजकीय कार्यातून स्वतःच्या फायद्यासाठी अवैध दारू विक्री करणारे रवी आणी नदी- ब्रम्हपुरी तालुक्यात अवैध धंद्यात वाढ करीत असल्याचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील जनता जाणून आहे हे मात्र नक्की.अवैध दारू विक्रीत सक्रिय रवी आणी नदी- वर त्यांचे पुढारी काय निर्णय घेतात याबाबत नागरिक उत्सुक आहेत. भाग १