Home यवतमाळ यवतमाल जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय १०२ रग्णवाहीका चालकांची उपासमारीची वेळ

यवतमाल जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय १०२ रग्णवाहीका चालकांची उपासमारीची वेळ

347

कृष्णा पत्रिवार

यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात सेवा देणार्या १०२ रूग्णवाहीका वरील १४ कंत्राटी चालकांचे सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारी पाळी आली आहे, सर्वच वाहन चालकांनी संबंधित कार्यालयात अनेक चकरा मारून त्याची दखल कोन्ही घेतले नाही, मा. जि.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देवूनही त्यात कोणतेही तोडगा निघाला नाही, म्हणून आता पाच दिवसांच्या आत वेतनचा निर्णय न दिल्यास जिल्हा परिषदेच्या प्रागणात शिवाजी सुभाषराव गावंडे ग्रामीण रुग्णालय सवना , शंकर भागडकर ग्रामीण रुग्णालय नेर , गजानन ठाकरे उपजिल्हा रुग्णालय उमरखेड , उमेश गुघाणे उपजिल्हा रुग्णालय दारव्हा ,
शेख रूयुप शेख अब्दुल ग्रामीण रुग्णालय लोही , आनंद मनोहर ग्रामीण रुग्णालय दिग्रस , भारत गायकवाड ग्रामीण रुग्णालय आर्णी , वैशुभ आलोने ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव , विशाल कटकदेवरे ग्रामीण रुग्णालय कळंब , स्वप्निल मेश्राम ग्रामीण रुग्णालय करंजी , राजकिरण राठोड ग्रामीण रुग्णालय मालेगाव , प्रमोद चव्हाण उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा , मनोज पोयाम ग्रामीण रुग्णालय झरी – जामणी व विजय गडे ग्रामीण रुग्णालय घाटंजी ,  सर्वच चालक सहकूटूंब अन्नत्याग आणि आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत आहे. तसेच तातडीने कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा सर्वांनी केली आहे.