Home विदर्भ पालकमंत्री  संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस

पालकमंत्री  संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस

336

अकोला – मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाल जिले के पालक मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर येथून यवतमाळकडे परतत असताना अकोला मुर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला. त्यात ४ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत. यामध्ये जखमी झालेले यामध्ये चालक अनिल ओंकार मडपासे ,SPU युनिट पोलिस कर्मचारी फहीम खान प्रफुल्ल वाळके गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत माहिती कळताच मंत्री श्री. राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली.

मंत्री श्री. राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे वाहन यवतमाळकडे परतत असताना मुर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला.