Home नागपूर बुटीबोरीजवळ चिंतामणी बसचा अपघात – सात प्रवासी जखमी, जीवितहानी टळली

बुटीबोरीजवळ चिंतामणी बसचा अपघात – सात प्रवासी जखमी, जीवितहानी टळली

1018

बुटीबोरी (प्रतिनिधी) :
नागपूरहून यवतमाळकडे येणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स ची बस (क्रमांक MH29/5995) बुटीबोरी परिसरात अपघातग्रस्त झाली. एका मद्यधुंद ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातावेळी ट्रक चालक पूर्णतः धुंद अवस्थेत गाडी चालवत होता. गाडीची दिशा नीट समजून न घेता तो चुकीच्या मार्गावर येत होता. त्यामुळे चिंतामणी बससमोर अचानक अडथळा निर्माण झाला. मात्र, बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून बसचे नियंत्रण सांभाळले आणि मोठा अनर्थ टाळला.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी त्याचे आभार मानले आहेत. संबंधित ट्रक चालकाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू आहे.