
रुपेश देशमुख ब्रम्हपुरी
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस कार्यक्षेत्रात पोलीस हद्दीत येत असलेल्या गांगलवाडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी ‘हप्ता वसूल’ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले *चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन* यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तळोधी येथील तिजा नावाचा व्यक्ती काही महिना अगोदर अवैध कोंबडी बाजार गोगाव परिसरात आणि तळोधीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडी बाजार भरवीत होता आता हाच युवक त्या दारूभट्टीतून मोठ्या प्रमाणात अवैध दारू सप्लाई करीत असल्याचे कळते रस्त्यावरील गांगलवाडी गावापासून जवळपासच्या खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात दारू सप्लायचे काम करीत आहे. माझ्या परिसरात पोलिसांना यायचं झालं तर मला कॉल करून येतात असा दमच हा अवैध दारू व जुगार सप्लायर नागरिकांना चौकात चौका चौकात देत असतो. हे सर्व गाव ब्रह्मपुरीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. या गावांचा समावेश आहे. यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अवैध देशी दारु , ताडी, यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.











































