Home महत्वाची बातमी चिमुकल्या मुलां देखत गेला आईचा जीव ,

चिमुकल्या मुलां देखत गेला आईचा जीव ,

748

 

 

वीरपांग्रा येथील दुर्दैवी घटना ,

अझर शाह

लोणार
आज सोमवार दुपारी लोणार बिबी सुल्तानपूर परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस पडला असून झालेल्या पावसात तालुक्यातील वीर पांगरा येथे शेतात काम करत असलेल्या शेतकरी महिलेवर त्याच्या दोन चिमुकल्यां देखत वीज कोसळली असून यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून दोन्ही चिमुकले मात्र सुखरूप बचावले आहेत मागच्या सोमवारी सुद्धा या भागात मोठं पाऊस पडून नुकसान झालं होतं वीरपांग्रा येथे शेतकरी महिला सौ. रजना संदीप चव्हाण (वय ३५) या कापूस वेचणीसाठी मजूर महिलांसह शेतात काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली.पावसाने जोर धरल्याने त्यांनी बचावासाठी लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला, पण दुर्दैवाने झाडावर वीज कोसळली आणि सौ. चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आहेत.