Home विदर्भ अमोलकचंद विधी महाविद्यालयात पार पडले पॅरा विधी स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीर

अमोलकचंद विधी महाविद्यालयात पार पडले पॅरा विधी स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीर

102

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. ०९ :- अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या विधी चिकीत्सालयामार्फत पॅरा विधी स्वयंसेवकांकरीता दोन दिवशीय शिबीर नुकतेच पार पडले. उद्घाटक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम. आर. ए. शेख तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विधीज्ञ ए. पी. दर्डा, आर. के. मनक्षे, प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, विधी सेवा चिकीत्सालयाचे प्रभारी डॉ. संदीप नगराळे उपस्थित होते.

न्यायमुर्ती शेख यांनी पॅरा विधी स्वयंसेवकांची कर्तव्ये आणि लिगल सर्व्हिसेस ऑथोरिटी अॅक्ट १९८७ यावर मार्गदर्शन केले. विधीज्ञ ए. पी. दर्डा यांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत कायदेविषयक सेवा पोहोचविण्यासाठी काम करावे, असे विवेचन केले. प्रास्ताविक डॉ. संदीप नगराळे यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी केले.

यानंतर झालेल्या प्रशिक्षणादरम्यान वरीष्ठ विधीज्ञ आर. के. मनक्षे यांनी बालकांचे लैंगिक अन्यायापासून संरक्षण अधिनियम यावर मार्गदर्शन केले. यावेळी अॅड अभिजित देशमुख, अॅड भारत सोधी, अॅड रविंद्र सोनटक्के, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायाधीश गायत्री नामदेव, पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, अॅड जगदीश वाधवाणी, डॉ. विदेश मुनोत, अॅड प्राची निलावार यांनी मार्गदर्शन केले.

अॅड सिमा तेलंगे यांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण साठ विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंजीत अगमे यांनी केले. यावेळी दिप्ती डुकरे, अजय आत्राम, ममता डोईफोडे, श्रेया आनंद, चारुशीला भोयर, हेमंत गायकवाड यांनी विशेष परीश्रम घेतले. प्रा. अंजली दिवाकर व प्रा. वंदना पसारी यांनी शिबीर आयोजनासाठी मार्गदर्शन केले.