Home यवतमाळ ई टी एस मोजणी न केल्यास विकास कामाच्या ठिकाणी आंदोलन

ई टी एस मोजणी न केल्यास विकास कामाच्या ठिकाणी आंदोलन

228

उमरखेड. ( प्रतिनिधी ) –  वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचे काम सध्या जोरात सुरू असताना उमरखेड पुसद दिग्रस नांदेड या ठिकाणी फेस 4 व 5 चे काम चालू असून त्याचे कंत्राट max infra, sushee, raghva या कंपन्यांना दिलेल्या असून उपकंत्राटदार अजून बरेच आहेत.
सविस्तर वृत्त असे की, रेल्वे विकास कामाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज रेल्वे कंत्राटदार/ उपकंत्राटदार हे राज्य शासनाच्या महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने खुल्या बाजारात विकत असून दर दिवशी करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडविल्या जात असून दर दिवशी लाखो रुपयांची कमाई केल्या जात आहे त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट केल्या जात आहे. सर्रास कायद्याचे उल्लंघन केल्या जात आहे असे स्पष्ट निदर्शनास येत आहे. अशी तक्रार संबंधित विभागाला तसेच विद्यमान महसूल मंत्री श्री बावनकुळे यांना केल्या गेलेली असून यासाठी वारंवार चौकशीची मागणी तसेच इ टी एस मोजणी ची मागणी केल्या जात आहे. परंतु संबंधित कर्मचारी जाणीवपूर्वक इ टी एस मोजणी करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
त्यासनुसार यातील तक्रारदार अमोल कोमावार ( व्हिसल ब्लोअर ) यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीनुसार केलेल्या तक्रारीवर तात्काळ जर ई.टी.एस.मोजणी केल्या गेली नाही तर विकास कामे चालू असलेल्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषण आंदोलन करेल अशी तक्रार संबंधित विभागाला केलेली असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्याकरिता तक्रारीत नमूद केलेले आहे. त्याचबरोबर जोपर्यंत ईटीएस मोजणी होणार नाही तोपर्यंत सर्व देयके थांबवावित तसेच काम सुद्धा थांबवावेत असे तक्रारीत स्पष्ट नमूद केलेले आहे.
विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अमोल कोमावार (व्हिसल ब्लोअर ) यांनी यवतमाळ येथील मोठमोठ्या रेल्वे कंत्राटदारावर करोडो रुपयांचा दंड ठोठावला असून सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका सुद्धा दाखल झालेली असल्याची माहिती मिळालेली आहे.