मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील नायगावात CAA व NRC कायद्या च्या समर्थनार्थ निघाली भव्य रॕली

Advertisements

नांदेड / नायगावा , दि.०९ :- ( राजेश भांगे ) दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नायगांव शहरात CAA व NRC कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन हिंदूत्ववादि युवक व नागरीकांनी केले.

या रॅलीमध्ये भाजपा नेते यांच्या सह अनेक मान्यवर, व्यापारी बांधव व नौकर वर्ग तसेच सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवुन “CAA व NRC” कायद्या च्या समर्थनार्थ निघालेल्या या रोड रॕलीस उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला आणि आपले समर्थन दिले.
तसेच मुख्य बाजार पेठ मार्गाने निघालेल्या या रोड शो रॕलीचे रूपांतर नरसी नांदेडरोड वरील विश्राम ग्रहा समोरील रोडवर एका मोठ्या सभेत करण्यात आले व या ठिकाणी अनेक भाजपा नेते व कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरीकांनी CAA व NRC कायद्या विषयी समर्थना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.
तरी या वेळी पोलिस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे या अनुशंगाने आपले कर्तव्य बजावत मोठ्या फौजफाटया सह चोख बंदोबस्त ठेवला होता.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...