Home यवतमाळ कॅन्सर ग्रस्त रुग्णाला मिळाली तिन लाखांची मदत , खासदार संजय देशमुख यांच्या...

कॅन्सर ग्रस्त रुग्णाला मिळाली तिन लाखांची मदत , खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नांना यश..!

367

यवतमाळ – एका गरीब रुग्णाला कॅन्सर उपचारासाठी मदतीची गरज आहे. हे लक्षात येताच पंतप्रधान सहायता निधीतून तातडीने तिन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. यासाठी खासदार संजय देशमुख यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला.

गुलशन नगर पांढरकवडा रोड यवतमाळ येथील मास्टर खान या गरीब रुग्णाला कॅन्सर आजार आहे. त्यांच्यावर नागपूर येथील केअर हॉस्पिटला उपचार करण्यासाठी उपचाराचा खर्च त्यांच्या परिस्थितीच्या
बाहेर आहे. ही बाब खासदार संजय देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा सुरु केला व स्वतः खासदारांनी पीएम फंड सहायता निधी कक्षाकडे लेखी पत्र देऊन ही बाब मांडली. त्यामुळे त्यांना तातडीने तीन लाख रुपये मिळाले आहे.‌
आता यातून अन्य खर्च भागविला जाणार आहे. या मदतीसाठी खासदार संजय देशमुख यांनी पंतप्रधान व पीएम फंड कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच पीएम फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज पारदर्शकपणे सुरू असून, रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.