
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आज, दिनांक 14 मार्च (शनिवार) रोजी शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे एम.एच. 29 हेल्पिंग हॅंड वन्यजीव संस्था यवतमाळच्या प्रतिनिधींनी भेट घेतली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश मेश्राम आणि कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे यांनी मृदा,जल,वन्यजीव संवर्धन तसेच उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम पाणवठ्यांसंदर्भात चर्चा केली.
याशिवाय,वनविभाग यवतमाळ यांच्या सहकार्याने ‘रॅपिड रेस्क्यू टीम’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.या टीममध्ये अनुभवी वन्यजीव अभ्यासक तसेच सर्पमित्रांचा समावेश करून त्यांना कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षित वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
मंत्री संजय राठोड यांनी संस्थेच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत,संबंधित प्रस्ताव आणि महत्त्वाच्या सूचनांची मागणी केली.तसेच,या कार्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष निलेश मेश्राम,उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने, युवा प्रमुख शुभम तेलगोटे,इंद्रजीत नेवारे,सचिन कोकणे,तसेच अंकित पवार,कल्याणी बोरकर,साक्षी जाधव,अंकित कोथळे,दिनेश पिंपरे,प्रथमेश जाधव,रवि वाईकर, पृथ्वीराज चव्हाण,विकास राठोड, जुनेद मलनस,आदी सदस्य उपस्थित होते.
—कोट
हे वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संतुलनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, या उपक्रमामुळे उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्यासाठी पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहेत. तरुण कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
— संजय राठोड(पालकमंत्री,यवतमाळ)
“उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवतो.त्यामुळे कृत्रिम पाणवठे उभारणे आणि प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येईल.”
— निलेश मेश्राम,(अध्यक्ष, एम.एच.29 हेल्पिंग हॅंड वन्यजीव संस्था,यवतमाळ)
🚩माऊली.












































