Home यवतमाळ ए.एस.आय.श्रावण राठोड लगातार सहाव्यांदा सन्मानित…

ए.एस.आय.श्रावण राठोड लगातार सहाव्यांदा सन्मानित…

742

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान!
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कडून सन्मान करण्यात येतो.यातच बाभुळगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते सहाव्यांदा सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ पोलीस दलात प्रशासकीय कामात उत्कृष्ट केलेल्या सेवेची दखल जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत घेतल्या जाते.यात बाभुळगाव पोलीस स्टेशनला कार्यरत ए. एस. आय.श्रावण राठोड यांची उत्कृष्ट कामगिरी बघता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक पियूष जगताप साहेब यांनी स्वतः जवळ बोलावून सन्मानाने प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. एक दा नव्हे,दोनदा नव्हे तर डबल हॅट्रिक करीत सहाव्यांदा ए. एस. आय. श्रावण राठोड सन्मानित झाल्याने बाभुळगाव पोलीस स्टेशनची निश्चितच मान उंचावली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक साहेबांनी त्यांना आपल्या जवळ बोलावून सन्मान केला आहे.सहाव्यांदा सन्मानित होणे ही अभिमानाची बाब असून या सन्मानाने पोलीस कर्मचारी व आम जनतेतून श्रावण राठोड यांची प्रशंसा करून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.