Home यवतमाळ सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – ना. संजय राठोड

सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – ना. संजय राठोड

286
अर्थसंकल्प प्रतिक्रिया….
राज्याचे उपमुखमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांचा सूक्ष्म विचार करून सादर केलेला सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार, उद्योजक अशा सर्व घटकांसाठी आजच्या अर्थसंकल्पातून भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’, ही योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे, हा महत्वाचा निर्णय आज झाला.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१८ गावांमध्ये 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत.
महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करुन  त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुध्द पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन, त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी करणारा हा अर्थसंकल्प आहे.
– संजय राठोड,
मंत्री, मृद व जलसंधारण तथा
पालकमंत्री, यवतमाळ