
अमीन शाह ,
खामगाव – शहरातून गावाकडे ऑटो मधून जात असलेल्या 70 वर्षीय वृद्धेचा पैशाचा पाकीट रस्त्यावर पडल्याने सदर वृद्ध महिलेने पाकीटसाठी धावत्या ऑटो मधून उडी मारल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना खामगाव अकोला मार्गावरील पिंप्राळा फाटा येथे 25 फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. तालुक्यातील कोलोरी येथील रहिवासी विमलाबाई बाळकृष्ण टिकार वय 70 ह्या खामगाव येथे कामानिमित्त आल्या असता त्यांचे काम आटोपून दुपारी ऑटोने कोलोरी गावाकडे जात असताना खामगाव अकोला मार्गावरील पिंपराळा फाट्याजवळ अचानक त्यांचे पैशाचे पाकीट त्यांच्याजवळून रस्त्यावर पडले. यावेळी घाबरून गेलेल्या विमलबाई टिकार यांनी पैशाच्या पाकिटसाठी धावत्या ऑटो मधून रस्त्यावर उडी घेतली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नातेवाईक योगेश महादेव टिकार यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी मर्ग ची नोंद केली आहे.
फोटो , सौजन्य गुगल











































