
बुलडाणा ,
-बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील ५५ वर्षीय युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सुभाष माधव हिवाळे वय ५५ रा. देऊळघाट असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे या युवकांनी आज दि २५फेब्रुवारी मंगळवार ३.३० वाजेच्या सुमारास बौद्ध वाडा तांदुळवाडी रोड देऊळघाट या ठिकाणी शेतात जाऊन दोरीच्या साह्याने आंब्याच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन-चार दिवसांत याच कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली होती ,आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी आहे मोठा मुलगा सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहे ,या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ही घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे. तीन-चार दिवसांत एका कुटुंबातील दोन जणांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा घटनांमागील कारणे शोधून कुटुंबाला आवश्यक मानसिक आणि आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे आहे.
स्थानिक प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ज्ञांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्या कुटुंबाला सहकार्य केले पाहिजे. आत्महत्येच्या घटना टाळण्यासाठी समाजात संवाद, मदतीसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.











































