Home विदर्भ संतोष नांदनकर यांना इंटरनॅशनल आयकॉन आवार्ड जाहीर

संतोष नांदनकर यांना इंटरनॅशनल आयकॉन आवार्ड जाहीर

333
0

👉🏻 रक्तदान हेच श्रेष्ठदान एक वटवृक्षाचे जाळे वॉट्सअप्प ग्रुप माध्यमातून विणले

वाशिम , दि. ०८ :- सध्या सोशल मीडिया मध्ये वॉट्सअप्प खूप प्रसिद्ध असून त्याचा कोणी वाईट तर कोणी चांगला वापर करताना आपल्याला दिसते. परंतु अश्यातच सध्या राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप या वॉट्सअप्प ग्रुप मार्फत महाराष्ट्र भर रक्तदानाचे कार्य मोठ्या जोमात सुरू आहे.तर या ग्रुपचे अध्यक्ष संतोष नांदनकर, गणेश गोटे,सचिन सोनुने,दीपक घोलप, प्रदीप गोटे,पवन घोलप, मंगेश काटे, मंगेश घोलप या युवकांनी हा अनोखा रक्तदानाचा गृप सुरू केला तर जवळपास त्यांना महाराष्ट्र भर यश सुद्धा मिळाले व अनेक रक्तदाते त्यांच्या ग्रुपशी जुळले व अनेक रुग्णाचे प्राण या ग्रुपच्या रक्तदात्यामार्फत वाचविले जात गेले. तर या महान कार्याची दखल घेत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार देऊन ग्रुपचे अध्यक्ष संतोष नांदनकर याना सन्मानित करण्यात येणार आहे. तर वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील रहिवासी संतोष नांदनकर यांनी राजे संभाजी ब्लड ग्रुप व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून वाशिम ,आकोला, हिंगोली ,नांदेड आणि इतरही जिल्ह्यामध्ये कुठलेही रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांनी रक्त पुरविण्याचे काम सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून त्यांनी ते पूर्ण केले आहेत आणि करत आहेत रक्तदानाचे हे जे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विणलेले जाळे समाजसेवेत या कार्यात भरपूर असे प्रतिसाद सुद्धा जिल्ह्यांमधून मिळत आहे तर याच कार्याची दखल घेऊन भोपाळ येथील एनएएएफ या संस्थेने घेतली आहे आणि इंटरनॅशनल आयकाँन आवार्ड 2020 हा राजे संभाजी ब्लड ग्रुपचे अध्यक्ष संतोष नांदनकर यांना देण्यात येत आहे.

मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे, परंतु प्रत्येक युवकाने हा रक्तदानाचा संकल्प करून स्वतः रक्तदान करावे आणि हा अवॉर्ड राजे संभाजी ब्लड गृप मधील प्रत्येक रक्तदात्याचा सुद्धा आहे – संतोष नांदनकर
( राजे संभाजी ब्लड ग्रुप अध्यक्ष )