Home जळगाव धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड

148

शरीफ शेख

रावेर , दि. ०८ :- येथील न्यायालयाने चेक अनादर झाल्या प्रकरणी आरोपीस सश्रम कारावासासह दिड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असुन दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच दंडाची रक्कम रु. ५०००/- सरकार ला जमा करावी लागेल. व रक्कम रुपये १४५०००/- फिर्यादीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे चेक देऊन फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अधिक असे. की, मुंदखेड ता. जामनेर येथील रहिवाशी सुनील जगानन जोशी याने जिल्हा न्यायालयातील एम.ए.सी.टी.दरखास्त मध्ये तडजोडीमध्ये एकूण रक्कम ८,५०,०००/- रुपयामध्ये तडजोड होऊन रक्कम रुपये २००००/- तडजोडीच्या वेळेस नगदी दिले होते. व बाकी रक्कम ८,३०,०००/- चे आठ चेक दिले. त्यात सात चेक प्रत्येकी एक लाख रुपया प्रमाणे दिले व एक चेक १ लाख ३०००० या रक्कमेचा दिला होता. सदर फिर्यादी सुशीला अनिल चौधरी हिने आरोपी सुनील गजानन जोशी यांच्याकडे वेळोवेळी रक्कमेची मागणी केली त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यापैकी पहिला एक चेक १ लाख रुपयांचा अनादर प्रकरणी रावेर न्यायालयाचने निकाल दिला आहे. सदर कामी सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्याचा धनादेश देऊन सदर तडजोडीची रक्कम देण्याची हमी व खात्री दिली होती. मात्र सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्यामध्ये धनादेश दिलेली रक्कम शिल्लक न ठेवता अनादर केला. त्यामुळे सुशीला चौधरी यांची फसवणूक केली म्हणून आरोपी विरुद्ध निगोशिएबल इस्टूमेंट अॅक्ट कलम १३८ प्रमाणे रावेर येथील न्यायालयात खटला दाखल केला होता त्या अनुषंगाने फौजदारी खटल्याच्या चौकशी अंती रावेर येथील फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश प्रथम श्रेणी न्यायमूर्ती महाशय आर.एल. राठोड साहेबांनी दिनांक ०५/०२/२०२० रोजी न्याय निर्णय देऊन आरोपी सुनील गजानन जोशी यास सश्रम कारावास तसेच दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव तीन महिने ज्यादाची शिक्षा दिली असुन दंडाची रक्कम १.४५.००० रुपये फिर्यादी सुशीला अनिल चौधरी यांना देण्याचा देखील आदेश न्यायालयाने आदेश पारित केला. त्याच वेळी महाशय न्यायालयाने आरोपी सुनील गजानन जोशी रा. मुंदखेडा ता. जामनेर, यास रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले. व फिर्यादी कडून फिर्यादी कडून अॅड. जगदीश एम. महाजन रा. वाघोड ता. रावेर व अॅड. सलीम एम. जामलकर रा. मोरगाव ता. रावेर व ज्युनिअर म्हणून अमोल नाईक यांनी कोर्टाचे काम पाहिले.