
प्रतिनिधी:- रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेचे खातेदार पिंप्री आंधळे येथील रहिवासी व छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस म्हणून कार्यरत असणारे प्रवीण राजाराम खिल्लारे यांचे अल्पशा आजाराने २४मे रोजी निधन झाले होते व त्यांचा शाखेमध्ये प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा काढलेला होता त्या अंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा देऊळगाव मही यांनी वारस पत्नी अनिता प्रवीण खिल्लारे यांच्या कडून आवश्यक कागदपत्रांसह विम्याचा क्लेम विमा कंपनीला पाठविला त्या अनुषंगाने विमा रक्कम खात्यात जमा झाली आहे व सदर रक्कम ही ३०डिसेंबर रोजी शाखाधिकारी व त्यांचे सहकारी यांनी ती रक्कम वारस अनिता प्रवीण खिल्लारे यांना दिली यावेळेस शाखाधिकारी अभिजीत वशिष्ठ, उपव्यवस्थापक निमिता अरगडे,शाखेचे रोखपाल सचिन जोशी ,विष्णू देशमुख यांच्या सह कल्पना खिल्लारे,राहुल भालेराव, अशोक सोळंके, अशोक शिंदे,सुभाष वायाळ यांच्या इतर गावचे खातेदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शाखेचे व्यवस्थापक अभिजित वशिष्ठ यांनी सर्व पात्र खातेदारांनी प्रधानमंत्री जीवनज्योती व जीवन सुरक्षा विमा काढून घ्यावा असे आवाहन केले.











































