
यवतमाळ – रमेश भीसणकर मूळचे बेचखेडा ता.जिल्हा.यवतमाळ इथले रहिवासी.सध्या लोहारा बायपास,बालाजी हॉटेल च्या बाजूला मुक्कामी राहतात.सध्यस्तीथ भीसणकर हे तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळचे ते कार्यरत तालुकाध्यक्ष असून कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळचे माजी संचालक होते.मागील कालखंडात ते बेचखेडा या ग्रामपंचायतीचे सरपंच सुद्धा होते.आज यवतमाळ शहरातील स्थानिक दत्त चौकात त्यांच्यावरती स्वस्त धान्याच्या दुकानाच्या वादावरून चौघांनी हॉटेल रामायणात अल्पोपहार करण्यासाठी आलेल्या भीसणकर यांच्यावर चाकूने हल्ला केला.त्यांच्या सोबत मित्रपरिवारातील काही सदस्य उपस्थित होते.मारेकऱ्यांमध्ये मारुती मोतीराम राठोड,अविनाश नारायण चिंचोळकर,विक्की वामन राठोड, संदीप नामदेव लिहितकर यांचा समावेश असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली.हल्ल्यानंतर वसंतराव नाईक रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.प्रकृती व्यवस्थित असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सुचविले.











































