
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
भारतातील फौजदारी कायद्याची सुरुवात भारतीय दंडविधान सहिता (आयपीसी)१८६० मध्ये ब्रिटिशांनी तयार केली होती.या कायद्याचा उद्देश ब्रिटिश साम्राज्याच्या गरजेनुसार होता.ज्यामुळे आता बदल होण्याची आवश्यकता होती.केंद्र सरकारने या कायद्यामध्ये दुरुस्ती करून नवीन कायदे अमलात आणले आहे.या कायद्याविषयी जनजागृती करण्याचे उद्देशाने घाटंजी न्यायालयाच्या सभागृहात दिनांक २१ सप्टेंबर रोज शनिवारला अखिल भारतीय अधिवक्ता परीषद, विदर्भ प्रदेश जिल्हा यवतमाळ तालुका घाटंजी, वकील संघ घाटंजी व विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते यवतमाळ सत्र न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील ॲड,वर्मा साहेब यांनी या नविन कायदेविषयक आवश्यक मार्गदर्शन उपस्थितांना केले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी घाटंजी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश क्र.१ न्यायमूर्ती उत्पात साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश क्र.२ न्यायमूर्ती कळमकर साहेब व वकील संघ घाटंजीचे अध्यक्ष ॲड.निलेश चवरडोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यशाळेत जेष्ठ विधिज्ञ अड.नेताजी राऊत, अड, अनंतकुमार पांडे, अड एम.बी.राठोड, अड,एम.एन.शुक्ला, अड,सौ.अनुपमा दाते,अड,सौ.रागिणी राऊत, अड,धुमाळ,अड, मरगडे,अड,सौ.पवार व कार्यालयीन कर्मचारी तथा पोलीस कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेचे सूत्रसंचालन अड.सादिक खान यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.एम.शुक्ला यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी त्यांना वकील सहाय्यक सतीश गजबे व त्यांचा चमूने भरपूर सहकार्य केले.असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.












































