Home यवतमाळ ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुनयना येवतकरांचे बेमुदत अन्नत्याग आजपासून, मागण्या मान्य न झाल्यास...

ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुनयना येवतकरांचे बेमुदत अन्नत्याग आजपासून, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरुच राहील

118

यवतमाळ – महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांचा समावेश होण्याकरिता प्रयत्न सुरू आहे.हा ओबीसीच्या प्रवर्गात येणाऱ्या ३७५ जातीवर अन्याय आहे.महाराष्ट्रात त्याबद्दल मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा झाली आहेत व होत आहेत.केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओबीसी प्रवर्गावर होत असलेल्या अन्याय दूर होण्याकरिता व ओबीसी समाजाच्या ईतर मागण्या मान्य होण्याकरिता उद्या दिनांक २२ सप्टेंबर पासून महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ,यवतमाळ येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

वडीगोद्री,जिल्हा जालना या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते प्रा . लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले,त्याला समर्थन म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरू करत असल्याची माहिती अजात च्या यवतमाळ जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सूनयना येवतकर यांनी माहिती दिली तसेच विविध ओबीसी सामाजिक संघटनांचा सदर आंदोलनाला पाठिंबा असल्याची माहिती विनोद इंगळे यांनी दिली.
यावेळी चैतन्या गोरे,महादेव कोडापे, शैलेश गुल्हाने, उत्तम गुल्हाने, ज्योती तिरपासे,विनोद इंगळे,अशोक तिखे,संजय येवतकर इत्यादी उपस्थित होते.