Home यवतमाळ महागाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश कामारकर

महागाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश कामारकर

80

उपाध्यक्षपदी किरण नरवाडे,सचिव पदी रमेश देशमुख यांची निवड…! 

महागाव:- महागाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश कामारकर,उपाध्यक्ष पदी किरण नरवाडे,सचिव पदी रमेश देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महागाव येथील विश्राम गृहावर महागाव तालुका पत्रकार संघाची बैठक जेष्ठ पत्रकार संपादक रितेशभाऊ पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी महागाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडी संदर्भात चर्चा करण्यात येवुन महागाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश कामारकर, उपाध्यक्षपदी किरण नरवाडे,सचिवपदी रमेश देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे,संजय पाटे,संतोष जाधव,विजय सुर्यवंशी, रवि कावळे,विशाल डहाळे,शेरखान पठाण, संजय नरवाडे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.या प्रसंगी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.