Home यवतमाळ शेतकऱ्यांचे १३ सप्टेंबरपासून यवतमाळला बेमुदत अन्नत्याग…

शेतकऱ्यांचे १३ सप्टेंबरपासून यवतमाळला बेमुदत अन्नत्याग…

113

सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमाप्रश्नी जिल्हाभर आंदोलन

यवतमाळ – सोयाबीन कापूसप्रश्नी शेतकरी नेते सचिन मनवर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती,शेतीला मजबूत कंपाउंड यांसह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ११ सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्यात घ्यावेत अशी मागणी आम्ही लावून धरली होती.अन्यथा १३ सप्टेंबरपासून यवतमाळ येथील आझाद मैदान येथे जय स्तंभा समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
“सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे.गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत,पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकारला आमचा शेवटचा अल्टिमेटम आहे. जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाहीत,तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील,” असा इशारा कृष्णा पुसनाके यांनी दिला आहे.गुरुवार (१२सप्टेंबर) मनवर यांनी भूमिका जाहीर केली.या वेळी प्रा.पंढरी पाठे,प्रकाश कांबळे,ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल चवरे,अभय अनासाने यांच्यासह अन्यत्र शेतकरी उपस्थित होते.