Home यवतमाळ श्री राजूजी काळे यांच्या घरी महालक्ष्मीची 19 वर्षाची परंपरा

श्री राजूजी काळे यांच्या घरी महालक्ष्मीची 19 वर्षाची परंपरा

20

आई अंजानबाई काळे कडून ही परंपरा सुरू झाली आणि त्यांच्या पत्नी वंदनाताई या परंपरेला कायम ठेवली आहे

अशोक जोगदंड तालुका प्रतिनिधी
दारव्हा / लोहीं :-लोही येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सध्या मुंबई मंत्रालय येथे वास्तव्यास असलेले स्वीय सहाय्यक श्री. राजूजी काळे यांच्या घरी गेल्या 19 वर्षापासून महालक्ष्मी विराजमान आहे. त्यांची आई अंजनाबाई काळे यांनी घरी महालक्ष्मी बसविण्याची परंपरा सुरू केली. आणि आज ही परंपरा राजू काळे यांच्या पत्नी सौ वंदना यांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे.मुंबई व नंतर अमरावती सारख्या मोठ्या शहरात राहून सुद्धा त्यांना गावाची जाण असून ते सदैव गावाच्या संपर्कात असतात आणि गावातील प्रत्येक लोकांच्या अडी अडचणीमध्ये हे दांपत्य धावून येतात.लोही (रामनगर )येथील वास्तव्यास असलेले काळे कुटुंबीय आपली परंपरा कायम ठेवून महालक्ष्मीचे मोठ्या थाटात आणि भव्य दिव्य आयोजन करतात त्यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांची महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होते असते. श्री.राजू काळे हे धार्मिक प्रवृत्तीचे असून त्यांनी लोही येते नवसाचा मारुती पण स्थापन केलेला आहे.डिसेंबर महिन्यात तिथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. हजारोच्या संख्येने तिथे भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात श्री.राजूजी काळे हे नेहमी समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवितात. लोही (रामनगर) गावाच्या विकासासाठी नेहमी ते सहकार्य करतात .