Home यवतमाळ उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी कर्मचारी...

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना होत असलेल्या मानसिक त्रासाबाबत….

172

जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन..

यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कंत्राटी कर्मचारी यांच्यावतीने आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद यवतमाळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हास्तर,तालुकास्तर व प्रभागस्तरावरील आम्ही सर्व कर्मचारी उमेद अभियान च्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करीत आहोत.अभियान व शासनाच्या विविध योजना राबवण्याकरिता मदत करणे, जिल्ह्यातील विविध कामाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.परंतु काम करीत असताना जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांचे कडून कंत्राटी उमेद कर्मचारी यांचे सतत मानसिक खच्चीकरण केले जात आहे.
ए.एम.एस.ॲप द्वारे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांना हजेरी सक्तीचे करण्यात आली आहे.जे इतर कोणत्याही सरकारी विभागात व इतर कोणत्याही जिल्ह्यात लागू नाही.सदर ॲप हे अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये पण नाही.उमेद मधील सर्व कर्मचारी हे क्षेत्रीय/फिल्ड वर्कर असल्यामुळे सदर ॲप लागू करणे हे अन्यानकारक आहे. यामुळे रात्री बे रात्री,सुटी च्या दिवशी काम करून सुद्धा फक्त अशा तांत्रिक बाबीमुळे कर्मचारी यांचे नुकसान होत आहे.

कोट
अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांना सह संचालक यांच्याकडून हीन दर्जाची व अपमानजनक वागणूक दिल्या जाते.तसेच कर्मचारी यांची चूक नसताना सुद्धा अभद्र भाषेमध्ये बोलल्या जात आहे.(जसे नालायक, हरामखोर,फुकटचा पगार घेता, लायकी नाही, कामावरून काढून फेकतो, इत्यादी.
विशाल मनवर,
तालुका अभियान व्यवस्थापक,महागाव,जिल्हा यवतमाळ.

कोट…
लोकसभेच्या पूर्वी पंतप्रधानांचा यवतमाळ दौरा होता त्यावेळी सुद्धा उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन लाख महिला उपस्थित केल्या.त्यानंतर पुन्हा किनी रोड, यवतमाळ या ठिकाणी शासन आपल्या दारी हा मुख्यमंत्री महोदयाचा कार्यक्रम राबविल्यानंतर तेव्हा सुद्धा उमेद च्या कर्मचाऱ्यांनी ५० हजार महिला उपस्थित केल्या.तसेच आत्ता झालेल्या वचनपूर्ती सोहळ्याकरता सुद्धा उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांनी ४० ते ५० हजार महिलांना उपस्थित केले.पण आयोजित या सरकारी कार्यक्रमांमध्ये उमेद च्या कर्मचाऱ्यांना बसण्याकरता सादिक खुर्ची सुद्धा दिला जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
— रोनल फुलझेले,उमेद संघटना जिल्हा अध्यक्ष,यवतमाळ जिल्हा.

अभियानातील कर्मचारी यांना काही मोजक्या घटकावरून व जे सहजशक्य नाही अशा कामे कमी असल्यामुळे,कामावरून कमी का करण्यात येऊ नये/कारणे दाखवा अशा नोटीस लगेच देणे. व जाहीर बोलणे की तुम्ही कंत्राटी आहे कधीही कामावरून कमी करू शकते मला फक्त तीन नोटीस देण्याची आवश्यकता आहे असे बोलल्या जात आहे. तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचे अभिप्राय न घेता खालील कर्मचारी यांच्यावर थेट कार्यवाही करणे.ठराविक तालुक्यांना व लोकांना टार्गेट करणे,इत्यादी.
यावेळी सारंग आगरकर,जिल्हा अभियान व्यवस्थापक,प्रीतम हस्ते,जिल्हा व्यवस्थापक,स्नेहा खडसे,जिल्हा व्यवस्थापक,जितेंद्र मेश्राम जिल्हा व्यवस्थापक,तसेच जिल्हास्तर,तालुकास्तर व प्रभागस्तरावरील उमेद अभियानातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.