Home महत्वाची बातमी ग्रुप वर मेसेज का टाकला यावरून तलाठ्यावर डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूने...

ग्रुप वर मेसेज का टाकला यावरून तलाठ्यावर डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूने हल्ला.

21

   हिंगोली,(श्रीहरी अंभोरे पाटील )
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांतर्गत येणाऱ्या परभणी औंढा रोडवरील आडगाव रणजी बुवा या ठिकाणी आज सकाळी साडेबाराच्या सुमारास तलाठी सज्जा आडगाव येथे एस डी पवार नावाच्या तलाठ्यावर चाकून हल्ल्या करण्यात आला.
तू ग्रुप वर मेसेज का टाकला म्हणून सावंत बोरी येथील दोन तरुणाने मोटरसायकल वरून आडगाव र. येथे येऊन तलाठी एस डी पवार यांना चौकशी करू लागले त्यावरून पवार यांनी त्यांना सांगितले की माझे काम आहे मी कर्तव्य म्हणून टाकले आहे त्यावरून बोरी सावंत येथून आलेल्या दोन व्यक्तींनी शासकीय कर्तव्यावर असलेल्या पवार यांच्या सोबत बचावाची केली त्यावरून खवळलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्या सोबत आणलेली लाल मिरची तिखट पावडर खिशातून काढून तलाठी पवार यांच्या डोळ्यात टाकली व सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तींनी तलाठ्यावर चाकूने हल्ला केला हल्ला करणारे हल्लेखोर जवळच असलेल्या सावंगी रोड या गावाच्या दिशेने मोटरसायकलून वाऱ्याच्या वेगाने प्रसार झाले जखमी अवस्थेत असलेल्या एस डी पवार यांना गावकरी यांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे