Home यवतमाळ काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना सप्ताह समारंभ सत्कार सोहळ्यात लोकनेत्याला डावलले…! 

काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना सप्ताह समारंभ सत्कार सोहळ्यात लोकनेत्याला डावलले…! 

66

यवतमाळ – काल दिनांक 25 ऑगस्ट रोजी स्वर्गीय श्री राजीव गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सद्भावना सप्ताह अंतर्गत नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख,खासदार बळवंत वानखेडे,खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ शहरातील एम डब्ल्यू पॅलेस येथे आयोजित केलेले होते.

मात्र या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नेते तथा स्वतःला लोक नेता म्हणून घेणारे भावी आमदारकीचे स्वप्न रंगविणारे बाळासाहेब मांगुळकर यांना मात्र या कार्यक्रमातून आयोजकांनी डावलले असल्याचे दिसत आहे. त्यांचे पत्रिकेतही नाव नसून एकाही बॅनरवर फोटो सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला नसून यामध्ये आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली की काय असे दिसत आहे. मात्र जन माणसांपर्यंत तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारा नेता अशी बाळासाहेब मांगुळकर यांची ओळख आहे. मात्र 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता ते विधान यवतमाळ विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचेही बोलल्या जात असताना त्यांचेच प्रतिस्पर्धी प्रवीण देशमुख तथा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष चंदू चौधरी यांच्या पुढाकारातून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून लोकनेते बाळासाहेब मांगुळकर यांना जाणीवपूर्वक दावल्या गेल्याचे चित्र दिसत आहे यावरून येणाऱ्या काळात काँग्रेसमध्येही ही दुफळी स्पष्ट दिसत आहे मात्र ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसनेच आयोजित केलेले असतांना या कार्यक्रमांमध्ये डावल्याने लोकनेते म्हणून सुपरिचीत असलेले बाळासाहेब मांगुळकर यांचे कार्यकर्ते प्रचंड संतापलेले यावरून दिसत आहे.