Home यवतमाळ “आमरण उपोषण” आंदोलनामुळे मंत्र्यांसह महसूल वर्तुळात खळबळ.

“आमरण उपोषण” आंदोलनामुळे मंत्र्यांसह महसूल वर्तुळात खळबळ.

14

यवतमाळ   ( प्रतिनिधी ) – ९ गंभीर मुद्द्यांवर दोषी असल्याबाबत साक्षी पुराव्यासह दोशी असल्याबाबत निश्चित करून दिल्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाई न केल्यामुळे श्री राऊत निवासी उपजिल्हाधिकारी , यवतमाळ यांच्या विरोधात वरिष्ठांना तक्रारी देऊन भ्रष्टाचारात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप लावून अमोल कोमावार (व्हीसल ब्लोअर ) यांनी आमरण उपोषणाचा इशारा एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना दिलेला आहे.

सविस्तर वृत्त असे की, घाटंजी तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या अनेक भ्रष्टाचाराच्या बाबतीत पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई न केल्यामुळे त्याचबरोबर मोहनिश शेलवटकर (परीविक्षाधिन तहसीलदार, घाटंजी) यवतमाळ तालुक्यातील किन्ही शिवारात चालू असलेला लेआउट विकासाच्या नावाने अनेक अनियमितत्ता तसेच नैसर्गिक संपत्तीचा खुलेआम नाश करणे, मौजे बिलायता तालुका घाटंजी येथील रेती जप्ती व पंचनामा झाल्यानंतर चोरी दाखवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विकल्या प्रकरणी चौकशी, अशा अनेक गंभीर विषयावर साक्षीपुराव्यानशी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे दोष निश्चित झाल्यानंतर सुद्धा मंत्री महोदयाच्या नावाने कारवाई केल्या जात नाही , खुलेआम मंत्री महोदयांच्या नावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी दिल्या जात आहे. श्री राऊत निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या विरोधात माननीय राज्यपाल महाराष्ट्र यांना तक्रारी करून सुद्धा त्यांची चौकशी व त्यांच्यावर कारवाई केल्या गेलेली नाही. वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या खोदकामातील गौण खनिज खुलेआम खुल्या बाजारात विकून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कारवाई नाही.
अशा अनेक प्रकरणांवर आजपर्यंत साक्षी पुराव्यासह भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर मंत्री महोदयांच्या हस्तक्षेपामुळे व “हप्ता वसुलीमुळे ” कुठलीच कारवाई केल्या जात नाही याउलट भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या जात आहे त्याचबरोबर तक्रारदाराचा आवाज बंद करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी ठेवून तक्रारदारावर हमले करणे ,तसेच खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करणे ,तक्रारदाराची बदनामी करणे, असे खुलेआम कृत्य घडत आहे . एवढेच नाही तर लोकशाही संपवून अराजकता माजवण्याचा मंत्रिमहोदयाचा मानस आहे.
भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाईसाठी लोकशाही बचाव करण्यासाठी अमोल कोमावार यांनी मा.जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात” आमरण उपोषणाचा” इशारा दिलेला आहे.
यापूर्वी 4 मार्च 2024 रोजी आमरण आंदोलनाचा इशारा दिलेला होता परंतु त्यावर श्री राऊत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करू असे पत्र दिलेले होते त्याचबरोबर आंदोलन मागे घेण्यासाठी सुद्धा विनंती केलेली होती परंतु निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीही कारवाई केल्या गेलेली नसून ते स्वतः भ्रष्टाचारात सहभागी आहे असा थेट आरोप अमोल कोमावार यांनी त्यांच्यावर या पत्रकाद्वारे लावलेला आहे. त्यामुळे या आमरण उपोषण आंदोलनामुळे मंत्री महोदय तसेच महसूल विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये हडकंप सुटलेला दिसत आहे.