Home यवतमाळ यवतमाळ शहरात जागतिक छायाचित्रण दिन सम्पन्न

यवतमाळ शहरात जागतिक छायाचित्रण दिन सम्पन्न

153

यवतमाळ – दरवर्षी 19 ऑगस्टला साजरा केला जातो. 1839 साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागेर यांनी ‘दागेरोटाइप’ ही पहिली छायाचित्रण पद्धत विकसित केली, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला आहे. छायाचित्रण कला आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ही एक क्रांतिकारक घटना ठरली.

त्याच अनुषंगाने जगभरातील सर्व फोटोग्राफर बांधव आज जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरे करतात त्याच. अनुषंगाने आज यवतमाळ येथील सर्व छायाचित्रकार मित्र परिवाराने सकाळी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या परिवारांना अल्पोपहार वाटप करून मेडिकल कॉलेज चौक येथून मा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांगुळकर तसेच प्रहार चे जिल्हा अध्यक्ष मा. नितीन भाऊ मिर्झापुरे यांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवा झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली व त्यानंतर शहरातील मुख्य मार्गवर फिरून या रेलीचा समारोप हा जाजु चौक येथे झाला .या कार्यक्रमास शहरातील वरिष्ठ छायाचित्रकार व युवा पिढीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.