Home यवतमाळ विधानसभा निवडणुकीत घाटंजी तालुक्याला प्राधान्य मिळेल काय?

विधानसभा निवडणुकीत घाटंजी तालुक्याला प्राधान्य मिळेल काय?

240

विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग*
—————————————-
राजू चव्हाण
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
समोर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना चांगलाच वेग आले असताना आदिवासी बहुल असणाऱ्या व अनुसूचित जमाती (एस.टी) करीता राखीव असलेल्या आर्णी, केळापूर विधानसभा मतदार क्षेत्रात बाहेरच्या इच्छुक उमेदवारांनी आपण निवडणूक लढवू या पार्श्वभूमीवर मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे.अश्यातच समोर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये घाटंजी तालुक्याला प्राधान्य मिळेल काय? असा सवाल घाटंजी तालुक्यातील जनता करतांना दिसत आहे.
आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघात घाटंजी,केळापूर,आर्णी या तालुक्यांचा समावेश होतो.आणि या मतदार संघातील घाटंजी तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.यामध्ये केवळ एकदाच माजी आमदार स्व.देवराव गेडाम यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे.या विधानसभा क्षेत्रामध्ये घाटंजी तालुका हा अनेक अर्थाने उपेक्षित तालुका म्हणून गणला जातो.विधानसभा क्षेत्रात केळापूर तालुक्यातील माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी एक पंचवार्षिक तर चार पंचवार्षिक माजी मंत्री अड शिवाजीराव मोघे व दोन पंचवार्षिक डॉ.संदीप धूर्वे यांनी प्रतिनिधित्व केले आहे.घाटंजी तालुका व्याप्तीने सुद्धा मोठा असून या तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.तसेच ईतर कुटुंब हे आपला उदरनिर्वाह रोजमजुरी करून करतात.तालुक्यात अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत.हाताला काम नसल्याने कोणते व काय काम करावे या विवंचनेने बेजार झाले आहे.या तालुक्यात आजपावेतो कोणत्याही लोकप्रतिनिधींनी एकही उद्योग अथवा रोजगारासाठी कोणतेही पावले उचललेली एकवण्यात नाही.प्रथमच शेतमालाला भाव नाही.यात शेतकरी वर्ग सुद्धा मेटाकुटीस आलेला आहे.एकदा निवडून आलेले आमदार परत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतच आटापिटा करून मतदारांना वळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात.या तालुक्यातील कित्येक उच्च शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात वन वन भटकत आहे.मात्र प्रतिनिधित्व करणारे केवळ आपल्या कार्यकर्त्यांना घेवून आपण निवडून कसे येईल याचाच जोगवा मांडताना दिसतात.आता विधानसभेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.यात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शोसल मीडिया,मुख्य रस्त्यावर बॅनर लावून,लहान मोठे शिबिराचे आयोजन करून जनतेचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. व मिळेल त्या संधीचा फायदा उचलत जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे.यावेळी मात्र मतदार संघातील व मतदार संघा बाहेरील अनेक इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली पहावयास मिळत आहे.वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी या पक्षातून माझी उमेदवारी निश्चित कशी हे सुद्धा पटवून दिल्या जात असल्याचे चित्र आहे.मात्र शोसल मीडिया असो किंवा सामन्याची पारावरची चर्चा असो स्थानिक उमेदवारावर भर दिसून येत आहे.बाहेरील आयात उमेदवार अजिबात खपवून घेणार नसल्याचे सुर उमटत आहेत.पक्ष कोणताही असो पण स्थानिक नागरिकांच्या समस्येची जाण व सरळ जनतेत समरस होणारा उमेदवार असावा याकरिता समोर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घाटंजी तालुक्याला प्राधान्य मिळेल काय? यासाठी काही इच्छुक उमेदवार पक्षाकडे दावेदारी सादर करीत असल्याचे ऐकण्यात आहे.