Home बुलडाणा अखेर त्या भक्ताला अमानुष मारहाण करणाऱ्या महाराज विरोधात गुन्हा दाखल ,

अखेर त्या भक्ताला अमानुष मारहाण करणाऱ्या महाराज विरोधात गुन्हा दाखल ,

41

 

अमीन शाह

बुलढाणा ,

दारूचा व्यसन सोडवण्यासाठी अनेक उपचार केले जातात, परंतु बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा जवळ एका आश्रमात सुरू असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या भक्ताला मारहाण केली जात असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समोर आला होता हा विडिओ राज्यभर पसरला होता वायरल विडिओ ची अनेकांनी निदा ही केली होती . आज या प्रकरणी मार खाणाऱ्या व्यक्तीने रायपुर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने व्यसनमुक्ती केंद्र चालवणाऱ्या शिवा महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
24 जून रोजी सोशल मिडीयावर घाटनांद्रा येथील महाराज हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ राज्यभर वायरल झालेला होता. सदर व्हिडिओ ची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना दिले होते त्यानुसार रायपुर ठाणेदार यांनी या प्रकरणाची माहिती घेवुन व्हीडिओ मध्ये मार खाणाऱ्या पिडीत व्यक्तीचा शोध घेतला व त्यानुसार सदर व्यक्ती नामे राजेश श्रीराम राठोड वय 36 वर्ष रा. माळेगांव, ता. मंठा. जि जालना हा आज 29 जून रोजी रायपूर पोलीस स्टेशनला आला व त्याने घडलेल्या प्रकाराबाबत दिलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा तालुक्यातील ग्राम घाटनांद्रा शिवारात राहत असलेल्या शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज याचे विरूध्द तक्रार दिल्याने शिवा महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ठाणेदार दुर्गेश राजपूत हे सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.