Home यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले भगवान मुंगसाजी महाराजांचे दर्शन

पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले भगवान मुंगसाजी महाराजांचे दर्शन

187

यवतमाळ,दि.१६ : दारव्हा तालुक्यातील संतनगरी श्री क्षेत्र धामणगाव देव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महाराजांचे दर्शन घेतले.

सोबतच मुख्य दरबार, श्री राम मंदिर संस्थान, चिंच देवस्थान येथेही त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद देखील साधला.