Home यवतमाळ दि. विदर्भ अर्बन क्रेडिट को-ऑप. वुमन सोसायटी चे यवतमाळ मधून पलायन…!

दि. विदर्भ अर्बन क्रेडिट को-ऑप. वुमन सोसायटी चे यवतमाळ मधून पलायन…!

123

अध्यक्ष – व्यवस्थापक व संचालकाचा मनमानी कारभार – पोलीसात तक्रार

यवतमाळ – २०१७ मध्ये यवतमाळ शहरात आर्थिक क्षेत्रात.दि. विदर्भ अर्बन क्रेडीट को-ऑप वुमन सोसायटी ने  आश्विनी हजारे यांचे अध्यक्षते खाली संस्थेची सुरुवात करून यवतमाळ शहरातील सर्व सामान्य ठेविदार, खातेदार दैनिक ठेविदार एजंट यांचे माध्यमातुन लाखो रुपये गोळा करून संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी हजारे ब्रांच मॅनेजर , सीईओ दादाराव गणपतराव हजारे तथा तत्कालीन संचालीका पुष्पा सारडे, शुभांगी काळे अर्चना मिठे, जब्बार मुमताज परविन अब्दुल, आशाबाई राजगुरे, पुजा दाहेकार कर मंगला लोणकर माया भोंगाडे, संगीता त्र्यंबक गावंडे, दुर्गा गुल्हाने आदींनी आपसात संगनमत करून दि. विदर्भ अर्बन क्रेडिट
कॉपरेटिव्ह ऑप वुमन सोसायटी नेर व यवतमाळ चे कार्यालय बंद करून लाखो रुपयाने गुंतवणूक दरांची फसवनुक केली आहे या संदर्भात पुलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड नेर पोलीस स्टेशन निरीक्षकांकडे गुणतवणूक दारानी तक्रार केली आहेत या प्रकरणी लवकरच फौजदारी गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे । स्टेट बैंक चौक व नेर येथील दाट शक्यता आहेत. नेर व यवतमाळ शाखा संचालक मंडळाने ग्राहकांना न सांगता बंद करून लाखो रुपयाची अफरातफर करून केली असल्याने ग्राहकांन मध्ये रोष वाढत आहेत. पदवीधर युवक युवतींना नोकरीचे आमिष देऊन सुद्धा संचालक मंडळांनी लाखो रुपयांची माया जमाविली आहे याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षा सौ अश्विनी हजारे सीईओ दादाराव हजारे व समस्त संचालक मंडळ विरुद्ध पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला व शेतकरी बांधवांचे हजारो लाखो रुपये या संस्थेत अडकले आहे तेव्हा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन समस्त संचालक मंडळ विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुंतवणूकदार व खातेदारांनी तक्रारीतून केली आहे.