Home यवतमाळ घाटंजी ठाणेदाराला जिल्हा पोलीस अधिक्षकांचे पाठबळ, “चारच दिवसात अवैद्य धंदे सुरू” 

घाटंजी ठाणेदाराला जिल्हा पोलीस अधिक्षकांचे पाठबळ, “चारच दिवसात अवैद्य धंदे सुरू” 

188
० ठाणेदार सुरडकर यांचे तात्काळ सेवेतुन निलंबन करा       
  ०  जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह 
० कारवाई न केल्यास कुठल्याही क्षणी आमरण उपोषण 
     घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर यांच्या मुकसंमत्तीने सुरु असलेले सर्व प्रकारचे अवैद्य धंदे आठ दिवसात बंद करुन ठाणेदारावर कारवाई करा अन्यथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वजा अल्टीमेटम हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लोकजनशक्ती पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा दै.तुफानचे यवतमाळ आवृतीचे निवासी संपादक प्रमोद वातीले यांनी तक्रारीच्या माध्यमातून दिला होता.तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेवरुन बंद करण्यात आलेले अवैद्य धंदे ठाणेदार सुरडकर यांनी चारच दिवसात पुर्ववत सुरू केले.त्यामुळे ठाणेदाराच्या या कृतिला जिल्हा पोलीस अधिक्षकांची मुकसंमत्ती तर नाही ना असा संशय बळावत आहे.ठाणेदारावर गैरमार्गाने अवैद्य संपत्ती गोळा केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता.त्या अनुशंगाने चौकशी होणे अपेक्षित होते.माञ याबाबत गृहविभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे ठाणेदाराला वरीष्ठ पाठीसी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणेदार सुरडकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी घेऊन आता कुठल्याही क्षणी अमरावती आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
           घाटंजी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर हे रुजु झाल्यापासून त्यांनी शासनाच्या महत्वपुर्ण निर्णयाची पायमल्ली करीत शासनाच्या व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करुन अवैद्य मार्गाने काळा पैसा कमावण्याचा सफाटा सुरु केला .पोलीस स्टेशनला दाखल होणा-या दखल पाञ गुन्ह्याच्या तक्रारीवर कारवाई न करता तक्रारीमध्ये आरोप असणा-यांना पोलीस स्टेशनला बोलावुन आर्थिक हित संबध जोपासण्याचे काम करुन तक्रार घेऊन जाणा-या व्यक्तिला बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याचा प्रकार सर्रास होतांना पहावयास मिळत आहे.त्याचबरोबर शहराला अवैद्य धंद्याचा विळखा बसलेला असुन सर्वञ अवैद्य व्यवसायाचे अड्डे  बिनधास्त सुरु आहे.शाळेच्या परीसरा लगत, बॅंकेच्या परीसरालगत, अगदी पोलीस स्टेशनच्या सभोताल, सार्वजनिक बाजारपेठेच्या ठिकाणी खुलेआम अवैद्य व्यवसाय करणा-यांनी आपली दुकाने थाटली आहे .आणि या सर्व अवैद्यपणे चालणा-या  व्यवसायाला सुरु ठेवण्यासाठी मुकसंमत्ती देऊन ठाणेदार नीलेश सुरडकर हे आपल्या हस्तकामार्फत लाखो रुपयाची अवैद्य संपत्ती गोळा करीत आहे.शहरात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायाकडे शाळकरी मुले, सुशिक्षित बेरोजगार हे वळत असुन यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.पोलीस स्टेशन हद्दीत चो-याचे प्रमाण वाढले आहे.यावर लगाम लावण्यात ठाणेदार सुरडकर हे सफसेल अपयशी ठरले आहे.अवैद्य व्यवसायाविरोधात तक्रार झाल्यास थातुरमातुर एक दोघांवर कारवाई करुन वरीष्ठांच्या नजरेत कर्तव्यदक्ष असल्याचा प्रयत्न हा ठाणेदाराकडून केला जात असल्यामुळे वरीष्ठ सुध्दा ठाणेदाराराच्या प्रतापाकडे डोळेझाक करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.एकंदरीतच अवैद्य व्यवसायामुळे शहरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत असुन याला सर्वस्वी ठाणेदार नीलेश सुरडकर यांचा आर्थिक हव्यास कारणीभुत ठरत आहे.त्यामुळे ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या भ्रष्टकारभाराची गोपनीय चोकशी करुन त्यांचेवर तात्काळ कारवाई होणे करीता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना तक्रारीच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती.तक्रारीची दखल घेत यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी अवैद्य व्यवसाय बंद करण्याच्या दिलेल्या सुचनेवरुन ठाणेदार सुरडकर यांनी अवैद्य व्यवसाय बंद केले.माञ चार दिवसातच सर्व प्रकारचे अवैद्य व्यवसाय सुरु झाल्याने याला ठाणेदार सुरडकर यांची मुकसंमत्ती आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी हिरवी झेंडी तर दिली नाही ना अस म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. जिल्हा पोलीस अधिक्षक आणि ठाणेदाराच्या या कृतिमुळे शासनाची व तक्रारदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेची आणि  ठाणेदार सुरडकर प्रकरणाची तक्रारीत नमुद मुद्यावर चौकशी करुन त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आलेलीआहे. शासन दरबारी मागणीचा विचार केला गेला नाही तर माञ न्याय मागणीसाठी अमरावती आयुक्त कार्यालयासमोर कुठल्याही क्षणी आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा वातीले यांनी गृहमंत्र्यांना दिला आहे.या तक्रारीच्या प्रती ह्या विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, पालकमंञी, विरोधीपक्ष नेता, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक,जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या आहे.
” ठाणेदार सुरडकर हे रुजु झाल्यापासून शहरामध्ये सर्व प्रकारचे अवैद्य धंदे सुरू आहे.याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर होत असुन केवळ आर्थिक हव्यासापोटी ठाणेदार सुरडकर हे अवैद्य व्यावसायिकांना पाठीसी घालत आहे. त्यामुळे त्यांचेवर कारवाई व अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली.माञ गृहविभागाकडून अपेक्षित कारवाई झालेली नसल्यामुळे आता लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय राहीला नाही “-  प्रमोद वातीले