Home यवतमाळ मौजे जरंग ग्रामस्थ कडून मा.ना.हंसराज अहीर यांचे जाहीर आभार

मौजे जरंग ग्रामस्थ कडून मा.ना.हंसराज अहीर यांचे जाहीर आभार

126

यवतमाळ – नागोबा देवस्थान जरंग (सेवानगर) ता.घाटंजी येथे अण्णासाहेब देशमुख जरंगकर यांनी ७० वर्षा पुर्वी सुरू केलेल्या नागोबा यात्रा महोत्सवात राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.ना. हंसराजजी अहीर साहेब यांनी नागोबा देवस्थान जरंग पर्यंत पोच रस्ता, नागोबा मंदीर परीसरातील सौंदर्यीकरण व मौजे जरंग ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची २ कि.मी. वरून पाईप लाईन करून दिले आहे, दि.१५ /१६/१७ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या यात्रा महोत्सव निमीत्ताने नागोबा यात्रेत येणार्या जनतेचे उपचार, ग्रामस्थाचे आरोग्य तपासनीसाठी सतत दोन दिवस फिरते दवाखाना आरोग्य उपचार रथ डॉक्टर, नर्स, भरपुर औषधी पाठवून जनसेवेचे खरे दर्शन भैय्यासाहबांनी घडवून दिले आहे,

या करीता माजी जि.प.सदस्या सौ.सरीताताई मो. जाधव, बाळासाहेब देशमुख जरंगकर, व्हिजेएनटी. आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, मधुभाऊ लेंडगुरे, तुळशीराम आडे यांनी सतत पाठपुरावा केल्याने वरील सर्व कामाला गती मिळाली व काम पुर्ण झाले, यात्रेत येणार्या भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी झालेले काम बघून समाधान व्यक्त करून ग्रामस्थांनी आभार मानले आहे.