
वर्धा (प्रतिनिधी) पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह वर्धा येथे शेख सत्तारभाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून रवि घुमे, बाळासाहेब चतारे, योगेश कांबळे, गजानन जिकार, बाळासाहेब वाघ, प्रशांत आजनकर, मनोज राऊत उपस्थित होते.

या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकार व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला पाहुणे ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली. खर्चाचे अंदाजपत्रक ठरविण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती सोबत एकनिष्ठ राहू अशी शपथ घेण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन संदिप रघाटाटे यांनी केले. सभेला भारत घवघवे, प्रमोद बोरकर, बंडूभाऊ बन, पियुष खोडे, गणेश भूतडा, महेंद्र पाटील, जितेंद्र गोरडे व जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.











































