जालना/लक्ष्मण बिलोरे
– मैत्रेय उद्योग समुहाने राज्यातील लाखों गुंतवणूकदारांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली असून राज्यसरकारने मैत्रेयची मालमत्ता जप्त केलेली आहे. जप्त मालमत्ता विक्री करून गुंतवणूकदारांना पैसे परत करावेत यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांच्या विविध संस्था,परिषद,संघटना प्रयत्नशील आहेत मात्र सातवर्षे उलटूनही अपेक्षीत यश मिळत नसल्याने गुंतवणूकदार हैरान झाले आहेत.१९९८ साली मैत्रेय समुहाने ठाण्यात कार्यालय उघडून मासिक,त्रेमासिक,वार्षिक हप्ते भरून सहावर्षांने परतावे देण्याचे सर्टीफिकेट गुंतवणूकदारांना दिले गेले.२०१५ पर्यंत मैत्रेयने रितसर परतावे दिले .कोट्याधीची मालमत्ता जमा झाल्यानंतर २०१६ साली राज्यभरातील संपूर्ण कार्यालये बंद करून गाशा गुंडाळला यामध्ये बॉटमलाईनचे लाखों गुंतवणूकदार अडकलले आहेत.गोरगरिबांचा हक्काचा,कष्टाचा पैसा अडकल्याने गुंतवणूकदारांना गेल्या सात वर्षांत मरनासन्न यातना सहन कराव्या लागत आहेत.मैत्रेयची संचालिका वर्षा सत्पाळकर फरारी आहे.तिच्यावर राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत मात्र पोलिसांना सत्पाळकर का सापडत नाही ? सत्पाळकरला शासन,प्रशासन पाठिशी घालत आहे काय ? असे विविध प्रश्न गुंतवणूकदारांना पडले असून मैत्रेय प्रकरणात मैत्रेयच्या बचावासाठी मोठी लॉबी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे ज्या लाखों गुंतवणूकदारांना मैत्रेय उद्योग समुहात फसविले त्या सिनीयर लोकांनी यातून अंग काढून घेत गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. एकही सिनियर परतावे मिळवून देण्यासाठी पुढे येत नाही की,फोनही रिसिव्ह करत नाहीत अशा गुंतवणूकदारांच्या तक्रारी आहेत. गुंतवणूकदार लोकांना परतावे मिळवून देण्यासाठी विविध संस्था, संघटना कार्यरत आहेत. परतावे मिळवून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदार लोकांकडून फिस आकारलेली आहे.फिसच्या माध्यमातून लाखों रूपये गुंतवणूकदारांकडून वसूल केलेले आहेत.शासन, प्रशासन,कोर्टकचेरीकडे कागदीघोडे नाचवले जात आहेत. काही गुंतवणूकदारांच्या मते फक्त दिखावा केला जात आहे.प्रत्यक्षात काहीच परिणाम दिसून येत नाही.मैत्रेय परतावे कधी मिळतील हे ठामपणे कुणीच सांगू शकत नाही.शासनाने कोर्टात,पाठपुरावा केला,गुंतवणूकदारांची व्यथा मांडली तर मैत्रेय मालमत्ता विक्रीची आर्डर निघू शकते असेही मत जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.५ डिसेंबर रोजी मुंबई शेशन कोर्टात मैत्रेय मालमत्ता विक्रीची आर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुंतवणूकदार संस्था,संघटना,परिषदेचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत. हिवाळी अधिवेशन मध्येही मैत्रेय प्रकरण तारांकीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.